ही काकी इथे काय करतेय, असे ट्विटरवर विचारणाऱ्या एका आयएएस अधिकाऱ्यावर अभिनेत्री स्वरा भास्कर चांगलीच भडकली. तू खरच आयएएस अधिकारी आहे का? असा प्रश्न करीत स्वराने थेट आयएएस असोसिएशनकडे तक्रार केली.
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या ‘रसभरी’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमधील अश्लील दृश्यांवर सातत्याने टीका होत आहे. आयएएस अधिकारी संजय दीक्षित यांनी देखील ‘रसभरी’वरुन स्वरा भास्करवर निशाणा साधला होता. त्यांच्या ट्विटवर आता स्वराने प्रत्युत्तर दिलं आहे. हा व्यक्ती खरंच IAS अधिकारी आहे का? असा प्रश्न तिने विचारला आहे.
" आयएमडिबीने स्वरा भास्करच्या रसभरी या वेब सीरिजला सर्वात कमी रेटिंग दिले आह हे योग्यच झालं. मला कळत नाही स्वरा काकी या सीरिजमध्ये शिक्षक बनून कोणतं इंग्रजी शिकवतेय. " अशा आशयाचे ट्विट संजय दीक्षित यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटवर स्वराने संताप व्यक्त केला आहे. “हा व्यक्ती खरंच IAS अधिकारी आहे का? ज्याने अनेक पुस्तकं लिहिली आहेत.” अशा आशयाचे ट्विट करुन तिने IAS असोसिएशनकडे तक्रार केली आहे. स्वराचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.स्वरा भास्कर गेल्या काही काळापासून अभिनयापासून दूर होती. आता ती ‘रसभरी’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मात्र ही सीरिज प्रेक्षकांना फारशी आवडलेली नाही. यामधील पटकथा व अश्लील दृश्यांवर अनेकांनी टीका केली आहे.परिणामी या सीरिजवरुन सध्या स्वराची खिल्ली उडवली जात आहे.